आंतरराष्ट्रीय महिला दिन: सर्व महिलांनी हे नक्की करावे

आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिन: सर्व महिलांनी हे नक्की करावे

दैनंदिन जीवनाचा जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणत्या न कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. कधीकधी तर असे सुद्धा होते की ते संकट खूप साधे असतात तर कधीकधी आपल्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते. या मध्ये संयम असणे सर्वात महत्त्वाचे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणे.

आता यात जर तुलना केली तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये धैर्य जास्त, सहनशीलता जास्त, आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा त्या जास्त खंबीर असतात. परंतु आधुनिक काळात हे गुण बदलत आहेत. महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत पण आरोग्याच्या दृष्टीने नाही.

शारिरीक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या विचार केला असता आपणास असे जाणवेल की यातील समतोल आधुनिक युगातील महिलांना पूर्णपणे नाही ठेवता येत आहे. आणि यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी या गोष्टी नक्की कराव्यात.

१) शारिरीक दृष्ट्या सक्षम बनणे :

आता तुम्ही म्हणाल की “ इतके काम आम्ही करतो ते शारिरीक दृष्टया सक्षम असल्या शिवाय का?“

तुम्ही करतात हो सर्व काम. सकाळी लवकर पण सर्वात पहिले तुम्हीच उठतात आणि रात्री सर्वात शेवटी सुद्धा तुम्हीच झोपतात.  

परंतु एवढे काम करत असताना आपण काय खातोय, काय पितोय, किती खातोय यावर लक्ष होते का तुमचे? 

बर, कुठे काही दुखतय, किती दुखतय याकडे होते का लक्ष ? नाही. फक्त भान हरपून काम करणे हेच माहिती आहे आपल्याला. 

परंतु जेव्हा आपण काम करतो तेव्हा शरीराच्या दोनही बाजू संपूर्णपणे वापरात आणतो का? 

उदाहरण द्यायचे झाले तर सकाळ-संध्याकाळ तुम्ही अंगण किंवा कुंपणाच्या आतील भाग झाडतात. केर काढतात तेव्हा तुम्ही दोनही हातांचा वापर करतात का ? 

शारिरीक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागतो… त्या व्यायामात आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू वापरात आणल्या जातात. स्नायूचा वापर होतो. त्यांच्यावर ताण निर्माण करण्यात येतो. त्यांची शक्ती वाढवण्यात येते ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडे सुरक्षित राहतात आणि त्यांना दुखापत होत नाही. 

शरीराची उजवी आणि डावी बाजू या दोन्ही बाजूमध्ये समतोल निर्माण होतो आणि ते आपल्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवते.

२)  मानसिक दृष्ट्या सक्षम बनणे :

आम्ही आधीही सांगितलं की पुरुषांपेक्षा महिला मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम आहेत. धैर्यवान आहेत, सहनशील आहेत. यासोबतच अजून काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी अंगिकारणे गरजेचे आहे. 

स्वतःची जाणीव असू द्यावी म्हणजेच स्वतःच्या भावना, विचार आणि प्रेरणा ओळखण्याची क्षमता निर्माण करावी, अडचणींवर मात करून पुढे जावे. एकाच जागी अडकून राहू नये. 

कधीकधी आयुष्यात असे क्षण येतात जे सोलवटून टाकतात. अशा क्षणी स्वतःवर कठोर होऊ नये. कोणीही विचारल्याशिवाय आपले मत देऊ नये. विचारणा झाल्यास स्वतःचे मत कोणाच्याही प्रभावाखाली न येता आत्मविश्वासाने मांडणे व योग्य सीमा निश्चित करणे. चहाड्या चुगल्यांपासून दूर रहावे. 

ताण तणाव हाताळण्यासाठी कौशल्य अवलंबणे. आत्मविश्वास वाढवण्यावर भर देणे. कृतज्ञ असणे. 

हे सर्व करण्यासाठी सर्वात पहिले आपण कोण आहोत हे जाणने गरजेचे आहे. 

पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, आपण कोण आहोत हे जाणण्यासाठी आपण कोण नाही हे माहिती असणे गरजेचे आहे. आणि ते करण्यात आपल्याला मदत करते ध्यानसाधना. 

ध्यान शिकायचे असेल तर माझी विनंती असेल की आपण सर्वांनी सुदर्शनक्रिया शिकावी. सुदर्शनक्रियेचे अगणित फायदे आहेत. 

कधीकधी लोक आपण शांत दिसतो समाधानी दिसतो म्हणून त्रास देण्याचे प्रयत्न करतात. अश्या वेळेस स्वतः स्थिर असणे खूप गरजेचे असते. सुदर्शनक्रिया आपल्याला स्थिर होण्यास मदत करते. 

३) भावनिक दृष्ट्या सक्षम बनणे : 

पृथ्वी वर असलेल्या प्रत्येक व्यक्ती मध्ये भावना आहेत. परंतु भावनांचा महासागर हा महिले मध्ये आहे. आता या महासागराला शांत केव्हा ठेवाय असावे आणि केव्हा प्रलयकारी असावे, हे समजणे गरजेचे आहे. दोघांमध्ये समतोल असणे गरजेचे. 

आयुष्यात बऱ्याच वेळेस या प्रत्येक भावनांचा वापर आपल्याला करावा लागतो. कोणत्या क्षणी कोणती भावना किती वापरायची हे जमले पाहिजे. एकदा का ही ‘क’ ची बाराखडी जमली की सर्व झाले.

आणि पुन्हा एकदा आम्ही सांगत आहोत की सुदर्शनक्रिया जरूर शिकावी. मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून बघितल्यास, ही क्रिया शिकणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. कारण आयुष्यात स्थिरता आणण्यास ही क्रिया खूप मदत करते.

शेवटी

विनंती करत इतकेच सांगेल एक स्त्री, एक महिला ही उर्जेचा स्त्रोत आहे, ती शक्ती आहे. हे सर्वांनी जाणावे. एक स्त्री शारीरिक, मानसिक व भावनिक दृष्ट्या जर सक्षम झाली तर तिच्यापेक्षा जास्त शक्तिशाली भूमीवर इतर कोणीही नाही. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *